Saturday, May 17, 2014

वीज??????

          मुळ संकल्पना:- राम सुर्यवंशी 
           सगळ्या सामाजिक समस्या, मानवतावादाचा घसरणारा दर्जा, पर्यावरणाचा ऱ्हास यामागे फक्त एक आणि एकच कारण आहे अस मला वाटत. आणि ते म्हणजे विजेचा शोध. कुठ त्या बेन्जामिन फ्रान्क्लीनच्या डोक्यात वीज लकाकली आणि हा उत्पात घडला अस वाटायला लागलय.
          अरे रे प्रश्नात पडलात ना? हा का अस वेड्यासारखं बडबडतोय म्हणून पण खरच आहे हो माझं. आता घ्या, कस्स? वाटलाच होत असच विचारणार तुम्ही. थांबा सांगतो. वीज न्हवती आणि सगळी माणस माणूसपणा जोडून होती. पण लागला त्या टवळीचा शोध आणि संपल सगळ. दिवे आले, हळू हळू यंत्र यायला लागली मग टीव्ही आले आणि माणूस माणसात मिसळायचाच विसरला. तो रमायला लागला पडद्यावरच्या हलत्या चित्रात. वीज नसती तर सगळी कॉलोनी अंगणात किंवा गार्डन मध्ये एकत्र जेवायला बसले असते. मस्त गप्पा झाल्या असत्या समाजप्रिय माणूस टिकला असता. पण तस काहीएक झाल नाही. आणि तिचे पराक्रम एवढ्यावरच थांबले नाहीत. तिच्यामुळेच किंवा तिच्या जीवावरच मोबाईल आला. मग सगळ जगच जवळ आल लोक म्हणायला लागले जग हे एक खेड झाल आहे. पण कसच काय? अहो शेजाऱ्याशी बोलण बंद झालय या खेड्याची मज्जा म्हणजे,"प्रत्येक जण आपापल्या घरात आणि प्रत्येकाच दार बंद आहे पण तरीही एकीवर बोलण हा प्रत्येकाचा छंद आहे." काय करायचं? वीज नसती तर बिचाऱ्यानी पत्र लिहिली असत. प्रत्येक शब्दाला महत्व आल असत. प्रत्येक पत्र महत्वाच वाटल असत. जाण राहिली असती. पण नाही का तर् वीज.
        वीज आली आणि तीनच AC आणला, फ्रीज आणला माणसाला बिघडवल. मोठे मोठे कारखाने निर्मिले आणि या सगळ्यांनी पर्यावरणाची वाट लावण्याचा उद्योग सुरु केला. वीज नसती तर ओझोनच भगदाड इतक मोठ नसत. पर्यावरणही अजून चांगल राहिलं असत. पण नाही!! का तर वीज.
       कुठतरी वाचल होत, "जो देश सर्वात जास्त वीज वापरतो, तो प्रगत मानला जातो." म्हणजे ज्याच जास्त वाटूळ होत तो प्रगत? ज्या देशात नवरा बायको शेजारच्या खोलीतून एकमेकांशी मोबाईल वरून बोलतील तो देश प्रगत? प्रगती झाली अस नक्की कधी म्हणायचं? जर माणुसकी संपणार असेल तर ती प्रगती असू शकत नाही अस मला वाटत. आणि माणुसकी मरण म्हणजे अधोगती. आणि आजच्या आपल्या अधोगतीच सगळ्यात मोठ कारण वीज आहे अस मला वाटत. 

No comments:

Post a Comment